सिंघण
सिंघण : ( ? –? जून १२४७). यादव घराण्यातील एक महाप्रतापी व कलाभिज्ञ राजा. त्याच्या पूर्वजीवनाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही; तथापि त्याचे अनेक ताम्रपट आणि शिलालेख महाराष्ट्र, कर्नाटक, माळवा, गुजरात, दक्षिण कोकण वगैरे प्रदेशांत उपलब्ध झाले आहेत.